धुळे- शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ ट्रकने धडक दिल्यामुळे बालक ठार झाल्याची घटना विवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवर घडली. आरीफ शब्बीर शेख (वय 11, रा. दिलदार नगर) असे मृत बालकाचे नाव आहे. तो ररस्ता ओलांडत असताना ट्रक (एन.एल. 01 ए.बी. 0672) ने त्यास धडक दिली. त्यात तो ठार झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाहनासह चालकाला ताब्यात घेतले. दगडफेकीत ट्रकचे नुकसान झाले. याप्रकरणी जोएब शेख शब्बीर यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक जगन मुजालदे (वय 41, तेहराजपूर, जि.बडवानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.