धुळे शहरात मनपाची वसुलीसाठी धडक मोहीम

0

धुळे । वारंवार मागणी करुनही कर न भरणार्‍या शहरातील टॉवर विरुध्द मनपाने धडक मोहिम हाती घेतली आहे. वसूलीसाठी टॉवरला सिल लावण्यात येत असून आजही शहरातील तीन टॉवर सिल केल्याची माहिती पथक प्रमुख नंदु बैसाणे यांनी दिली आहे. चितोड रोड परिसरातील साईदर्शन कॉलनीत एसेन्ट कंपनीचे टॉवर असून या टॉवरवरुन युनिनॉरची सेवा ग्राहकांना दिली जात होती. या टॉवरच्या करापोटी जवळपास 6 लाखांची रक्कम थकीत झाली होती. वारंवार मागणी करुनही संबंधीत करभरणा करीत नसल्याने सिल लावण्यात आले. तशी माहिती संबंधीतांना दिली असून दुपारपर्यंत त्यांनी संपर्क साधला नव्हता. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये घबराट उडाली आहे.

बैसाणेंच्या पथकाने केली कारवाई
दुसरी कारवाई नवजीवन ब्लड बँकेजवळील मराठे यांच्या घरावर असलेल्या जीटीएल कंपनीच्या टॉवरवर करण्यात आली. या ठिकाणाहूनही युनिनॉरचीच सेवा पुरविली जात होती. या टॉवरच्या भाड्यापोटी तब्बल 7 लाख 93 हजारांची थकबाकी होती. तर तिसरी कारवाई अशोक नगरमधील रविंद्र मराठे यांच्या घरावर असलेल्या जीटीएल टॉवरवर करण्यात आली. या ठिकाणाहूनही युनिनॉरसह एअरटेल व जिओ मोबाईल सेवा पुरविली जात होती. याठिकाणी देखील 7 लाख 93 हजारांची रक्कम थकीत होती. ही कारवाई पथकप्रमुख नंदु बैसाणे यांच्यासह नारायण सोनार, एस.एस.भामरे,जगन ताकटे, अनिल साळुंके, बाळु मंगिरकर, प्रकाश सोनवणे, नितीन पटेल यांच्या पथकाने केली.