धुळे शहरात शिवसैनिकांच्या वतीने मूकमोर्चा

0

सेनेतर्फे आमदार गोटेंचा निषेध

धुळे। भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शुक्रवारी 6 एप्रिल धुळे शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. जुने धुळ्यासह शहरातील तसेच जिल्ह्याभरातून महिला पुरुष आणि तरुण शिवसैनिक या मूकमोर्चात सामिल झाले. अत्यंत शिस्तबद्धरित्या घोषणाबाजी न करता हातात भगवे झेंडे व निषेधाचे फलक घेऊन हे नागरिक मोर्चात सहभागी झाले. मोर्चा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडकला असता प्रमुख पदाधिकार्‍यांनी पोलिस अधिक्षक एम.रामकुमार यांना निवेदन दिले. त्यानंतर जेल रोडवर मोर्चाचे रुपांत सभेत झाले.

100 जणांविरोधात गुन्हा
30 मार्च रोजी पांझरा नदीकाठच्या रस्ते कामात अडथळा ठरणार्‍या अतिक्रमण हटविण्याच्या वादातून रात्री 11 वाजेनंतर आमदार गोटे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी व जुने धुळ्यातील नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यावरून आमदार गोटे यांनी थेट जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा दावा करून हिलाल माळींसह 100 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर शिवसेना आणि आमदार गोटे यांच्यात राजकीय युद्ध भडकले असून गोटे यांच्या निषधार्थ मोर्चा काढण्यात आला.

यांनी दिले निवेदन

निवेदन देतांना माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेविका हिराबाई ठाकरे,ज्योत्सना पाटील शानाभाऊ सोनवणे, कैलास पाटील, भुपेश शहा, हिम्मत महाजन, डॉ.सुशिल महाजन, छोटू पाटील, नितीन पाटील, सुनिल बैसाणे, नरेंद्र अहिरे, कविताताई क्षीरसागर, पंकज गोरे, वैशाली लहामगे, रावसाहेब गिरासे, संदीप सूर्यवंशी, भिलेश खेडकर, बन्सी वाडीले, संदीप शिंदे, पुरुषोत्तम जाधव, पंकज चौधरी, भटू गवळी, संदीप चव्हाण, कैलास मराठे, रामदास कानकाटे, केशव माळी, प्रफुल्ल पाटील, आबा भडागे, संजय जगताप, सागर निकम, सुदर्शन पाटील, दिनेश पाटील, हेमाताई हेमाडे, आदी उपस्थित होते.