धुळे शहरासह जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

0

धुळे । भारताचा 70 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ घोष करून परिसर दणाणून सोडला होता. स्वांतत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यासोबत शासकीय व राजकीय पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहण करून स्वांतंत्र दिन साजरा करण्यात आला. शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली.

पिंपळगाव येथे गुणगौरव
पिंपळगाव (खु) आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबकराव भाऊराव सोनवणे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विनोद सोनवणे, संचालक मंडळ गावकरी उपस्थित होते. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आर.व्ही.दशपुते.तर आभार एस. एस भदाणे
यांनी केले.

शेतकर्‍यांनी पीक कर्ज घ्यावे
जिल्ह्यातील 28 हजार 626 शेतकर्‍यांना 248 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले. पालकमंत्री भुसे म्हणाले, जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 10 महसूल मंडळात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत 4 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. सद्य:स्थिीत पावसाने दडी मारली आहे. मात्र, शासन शेतकर्‍यांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत 38 हजार 700 शेतकर्‍यांना अर्ज वितरीत केले आहेत. डॉ. पंजाबाराव देशमुख व्याज सवलत योजनेत नियमित कर्जफेड करणार्‍या 38 हजार 237 शेतकर्‍यांना सुमारे साडेचार कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्यासह अधिकारीवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

पिंपळनेर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
पिंपळनेर । अनुदानित आश्रम शाळा पिंपळगाव (खु) ता. साक्री जि. धुळे येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबकराव भाऊराव सोनवणे. तसेच विनोद सोनवणे, बोवाजी मावळी, सुनिल चौरे, मोहन सुपेकर हे उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी यांनी मन लावून अभ्यास करावा असे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन आर.व्ही.दशपुते.तर आभार एस. एस. भदाणे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

शिंदखेडा येथे शैक्षणिक चित्ररथ
शिंदखेडा । सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद् धुळे अंतर्गत शिक्षण विभाग गट साधन केंद्र पंचायत समिती शिंदखेड़ा येथे शैक्षणिक चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिंदखेडा पंचायत समिती सभापती सुनंदा गिरासे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यानंतर चित्ररथ हा शिंदखेड़ा शहर शिवाजी चौफूली मार्ग चिरणे महाळपुर भाबुळदे निशाने चिमठाने गांव हतनुर गांव भड़ने रेल्वे स्टेशन परसामळ या ठिकाणी शैक्षणिक चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मेथी येथील सामाजिक कार्यकर्त नरेंद्र गिरासे शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, गट विकास अधिकारी सुरेश शिवदे, गटशिक्षणधिकारी मनिष पवार, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समितीतील सर्व अधिकारी, विभाग प्रमुख कर्मचारी गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. शैक्षणिक चित्ररथ कार्यक्रम हा गटशिक्षणधिकारी मनिष पवार यांच्या मार्गदर्शनखाली घेण्यात आला. यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

एन.डी.मराठे विद्यालय
शिंदखेडा । आण्णासाहेब एन.डी.मराठे विद्यालयात भारत मातेचे सूपुत्र व सध्या भारतीय सिमेवर सेवा बजावत असलेले जवान श्री.देवीदास कोळी व श्री.देवेंद्र बोरसे यांना निमंत्रीत करून त्यांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाच्या मैदानावर भव्य असे शहिद स्मारक रेखाटले होते. त्यानिमित्ताने शहीद जवानांची आठवण झाली. विद्यार्थ्यांची भाषणे, गितगायण असे विविध कार्यक्रम झाले.त्यानंतर जायन्टस् गृप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक एन.एस.सोनावणे यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आपल्या मनोगतातून मांडला. भारतीय जवान देवीदास कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले व ध्वजारोहण करण्याची संधी देवून सन्मान केल्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव मराठे, मुख्याध्यापक अमोल मराठे जायन्ट्स गृप चे रोहीत भोजवानी, मधुकर सैंदाने, डॉ.देवेंद्र पाटील डॉ.आकाश पवार, प्रा.के आर देसले, अमित अमृतकर, सागर तलवारे, अक्षय देसले व पालक उपस्थित होते.

अभ्यासकांसाठी ‘आपला धुळे जिल्हा’पुस्तिका ठरेल मार्गदर्शक : पालकमंत्री भुसे
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ‘आपला धुळे जिल्हा’ पुस्तिका स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थी, अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे या पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली पुस्तिकेला संदर्भ मूल्य आहे. या पुस्तिकेत जिल्ह्याची थोडक्यात पण सर्वंकष माहिती नागरिकांना उपयुक्त ठरणारी आहे. अशाच प्रकारचे उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने राबवावेत, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी शुभेच्छा दिल्या.जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजपूत यांनी पुस्तिकेविषयी माहिती दिली.

या पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे. संपादन साहाय्य गोपाळ साळुंखे, मनोहर पाटील, संदीप गावित यांनी केले आहे. या पुस्तिकेतील छायाचित्रे अशोक पाटील, राजेंद्र सोनार यांची आहेत. या पुस्तिकेचे वितरण रावण मोरे, अरुण वंजारी, श्रीमती यमुनाबाई सोनवणे यांनी केले आहे, तर संदर्भ स्त्रोतसाठी जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालय, धुळे यांनी सहकार्य केले आहे. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्ह्यातील वैशिष्ट्ये नमूद
या पुस्तिकेत धुळे जिल्हा, जिल्ह्याची वैशिष्ट्ये, लोकसंख्या, तालुका व गावे, नद्या, डोंगररांगा, वनक्षेत्र, वन्य जीव, अभयारण्ये, शिक्षण, जिल्ह्यातील महत्वाचे सण, सिंचन प्रकल्प, कृषी क्षेत्र, उद्योग, पर्यटन स्थळे, सर्वधर्मीय तीर्थस्थळे, प्रार्थना स्थळे, महत्वाचे पुरस्कार, शासनमान्य यादीवरील महत्वाची दैनिके आदी माहितीचा समावेश आहे. या पुस्तिकेच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री दादा भुसे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावलयांची प्रेरणा मिळाली आहे, तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर (माहिती) (प्रशासन), शिवाजी मानकर (माहिती व वृत्त) (जनसंपर्क) यांचे मार्गदर्शन लाभले, तर समनव्य निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे उपसंचालक सुरेश वांदिले (प्रकाशने), नाशिक विभागाचे प्रभारी उपसंचालक (माहिती) यांनी समन्वय साधला.

राष्ट्रवादी भवनात स्वातंत्र्यदिन उत्साहात
धुळे । भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 वर्धापन दिन धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. मा.महापौर मोहन नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पुर्वी भारत मातेचा प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, सभापती कैलास चौधरी, सभागृह नेता अर्शद पठाण, महिला बालकल्याण सभापती इंदु वाघ,उपसभापती चंद्रकलाबाई जाधव,नगरसेविका यमुनाबाई जाधव, अनिल मुंदडा, रविंद्र पाटील,राजकुमार बोरसे,शितल नवले, नगरसेवक संदीप पाटोळे, गोटु शार्दुल, दिपक शेलार, मामुद पेंटर,सुभाष जगताप,नगरसेविका माधुरी अजळकर, शशिकलाताई नवले, यमुनाबाई जाधव, ललीता आघाव,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा,साहेबराव देसाई, लहु पाटील,सुधाकर बेंन्द्रे, जगदिश गायकवाड,गुफरान शेठ पोपटवाले,वाल्मीक आणा जाधव,एकनाथ अहीरे, संजय वाल्हे,बाळु आगलावे,रमेश लहामगे, भटु कानडे, सचिन आखाडे, कुणाल पवार,रवि कोरे,दिनेश पोतदार,संदीप हजारे, मयुर शर्मा आदि उपस्थित होते.

भाजपा दिव्यांग सेलतर्फे साहित्य वाटप
धुळे । भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपादिव्यांग सेल तर्फे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिन फाशीपुल येथे भाजपा दिव्यांग सेलतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनी गोर-गरिब कष्टकरी वर्गाच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हे होते. यांच्या अध्यक्षतेखाली भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

फाशी पूल चौकात कार्यक्रम
यावेळी अनुप अग्रवाल म्हणाले की, भारतातील सर्व जाती, धर्म व पंथ यांचा विकास जर घडवायचा असेल तर शिक्षण फार महत्वाचे आहे. तर आपल्या देशातील गोर-गरिब कष्टकरी वर्गाच्या मुलांना शालेय वस्तूंचे वाटप व योग्य मार्गदर्शन जर मिळाले तर भारत देश जगात प्रगत देश झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त केला. यासाठी भाजपाचा नारा आहे की सबका साथ सबका विकास. फाशीपुल चौकातून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे याच्या त्यानी कौतुक केले. सूत्रसंचालन दिग्विजय गाळणकर यांनी केले तर प्रा.किशोर वाकळे यांनी आभार मानले. यावेळी हिरामण गवळी युवराज पाटील. शशी मोगलाईकर, दलित मित्र क्षीरसागर गुरुजी, भारती माळी, कविता पवार, अमृता पाटील,मेघा बोरसे,संदीप बैसाने,अमोल धामणे, सुरेश कांबळे,सतीश चांदणे, रवी बोरसे,मनोज शिरूडे,किरण रणमाळे,अनिल थोरात, सचिन शेवतकर, अजय अग्रवाल. आर.पी.वाकळे, इंदल जाधव,निशिकांत अवचिते, गणेश देवरे, अशोक बोरसे, भटु सूर्यवंशी, शंकर लोंढे, आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते. दिव्यांग बाधंव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघाडी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण
वाघाडी । शिरपुर तालुक्यातील वाघाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच विमलबाई भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाघाडी ग्रा.पं.उपसरपंच सतिष पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.एस.वाघ, तलाठी बी.एस.चौधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, केदार वाणी, शांतीलाल पाटील, अनिल मिस्तरी, ग्रा.पं.सदस्य भगवान पाटील, अर्जुन माळी, प्रशांत देशमुख, बापू पाटील, शिरीष भामरे, माजी उपसरपंच विनायक देवरे, श्रीराम ऐंडाईत, निंबा माळी, सुनिल माळी, ज्ञानेश्वर भामरे, सुभाषनगर ग्रा.पं.चेे सरपंच गोपाल दाभाडे, सदस्य विजय पवार, फिरोज जमादार, श्रावण साळुंके आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी श्याम देशमुख, दिलीप वाणी, नाना रोकडे यांनी परिश्रम घेतले.

सुभाषनगर ग्रा.पं.स्वातंत्र्य दिन
वाघाडी । सुभाषनगर (वाघाडी) येथील ग्रा.पं.च्या मैदानात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच गोपाल दाभाडे यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करून ग्रा.पं. सदस्य सुधाकर वाल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ग्रा.पं.उपसरपंच शितल दाभाडे, सदस्य विजय पवार, फिरोज जमादार, वैशाली दाभाडे, वैशाली निकम, मनोज पवार, ग्रामविकास अधिकारी एस.एस.वाघ, वाघाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, अनिल मिस्तरी, श्रावण साळुंके, तसेच ब. ना. कुंभार माध्य. विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, सुभाषनगर जि.प. मराठी शाळेचे विद्यार्थी शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यासह गावातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा.पं.कर्मचारी लहू दाभाडे, हिलाल पवार, योगेश माळी यांनी परिश्रम
घेतले.

शिरपूर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कुरखळी। जि. प. मराठी शाळा कुरखळी येथे अवधूत गणपत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विद्यार्थी हे शालेय गणवेशात उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, योगेश्वर मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालकवर्ग, व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

डिजिटल वर्गाचे उद्घाटन
यावेळी शाळेतील डिजिटल वर्गाचे उद्घाटन अवधूत गणपत मोरे व अशोक छगन धनगर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा सावळदे येथील ध्वजारोहण सरपंच मनीषा सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते.

शिरपुरात भाजपातर्फे ध्वजारोहण
शिरपुर । येथील भाजपातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याहस्ते भाजपा कार्यालयात करण्यात आला.तसेच भाजपा कार्यालय शिरपुरचे नुतनीकरण करण्यात आले त्याचेही उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवुन देणार्‍यां सर्व हुतात्मांचा व लढवय्या सैनिकांचा तसेच त्यांचा कुटुंबियांचा देशाला अभिमान असल्याचे सांगीतले. यावेळी भारत माता प्रतिमा पुजन शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषध्यक्ष आबा धाकड, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज निकम, नगरसेवक राजेंद्र गिरासे, नगरसेविका मोनिका शेटे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष रोहीत शेटे, शहर चिटणीस राधेश्याम भोई, रहीम खाटीक,अल्पसंय्खक मोर्चा जिल्ह सरचिटणीस मुबीन शेख,जिल्हा चिटणीस जाकीर तेली,शहराध्यक्ष अरमान मिस्तरी,भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष रविंद्र भोई, तालुका सोशल मिडीया संयोजक निलेश देशमुख, शहर प्रसिध्दी प्रमुख निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत,तालुकाध्यक्ष सुनिल माळी, शहराध्यक्ष विक्की चौधरी, बापु लोहार, रवी सोनार, जवयंत पाटील, जगन पाटील, सुनिल चौधरी आदी उपस्थित होते.

भामेर विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
भामेर । साक्री तालुक्यातील भामरे येथील भिमाई निवासी मतीमंद विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात झाला. यावेळी ध्वजारोहण ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आबासाहेब मनोज सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भरत वाघ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त ग्रामसेवक बापु चिंधा भामरे, यशवंत सोनवणे, धनराज पाटील, का.स.माळी मा.विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.सी.सोनवणे, प्रकाश सोनवणे, जिभाऊ वाघ, दाजभाऊ पगारे, संतोष पानपाटील उपस्थित होते. या कार्यक्रमा का.स.माळी माध्यमिक विद्यालय व जि.प.मराठी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका, आशा सेविका गावातील सर्व नागरीक आदी उपस्थित होते. भिमाई निवासी मतीमंद विद्यालयाचे शिक्षक जुगलकुमार मरेकर, वसंत गायकवाड, पंकज भामरे, धृपताबाई भामरे, अनिता थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष थोरात यांनी केले.