धुळे । मनपा स्थायी समिती 8 सदस्याचे निवडीसह महिला व बालकल्याण समितीच्या संपुर्ण फेररचनासाठी विशेष महासभा मनपा सभागृहात सकाळी 11.30 वाजता महापौर कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ, उपमहापौर अन्सारी, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी याच्यासह सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या नवनियुक्त वैशाली लहामगे याचा महापौरांनी सत्कार केला. यानंतर महापौर कल्पना महाले यांनी गटनेत्याकडून आलेल्या नावाच्या वाचन करून नविन स्थायी समिती सदस्य व महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात स्थायी समिती सदस्यपदी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र शिरसाठ, नलिन वाडीले, कशिश उदासी, जुलाह मकबूल अली याची तर शहर विकास आघाडीचे सुभाष खताळ, फातिमा शेख याची तर शिवसेनेचे विश्वनाथ खरात, काँग्रेसचे लिना करनकाळ याची निवड जाहीर केली.
महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड
यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांची महापौरांनी कल्पना महाले यांनी जाहीर केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकला नवले, यमुना जाधव, ललिता आघाव, चद्रकला जाधव, नलिन वाडीले, जेसुन्नीसा पठाण, शविआचे चित्रा दुसाने, माधुरी अजळकर, शिवसेनेचे मुक्ताबाई, हिराबाई ठाकरे, काँग्रेसच्या श्रीमती. मोमीन आतीयाबानो दोस्त महमंद याची निवड जाहीर केली. निवड झालेल्या सदस्याचा महापौरच्या हस्ते सत्कार करण्यात आला.