धुळ्याची 120 कोटींची अक्कलपाडा योजना मार्गी लावणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

धुळे- धुळ्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे आलेल्या 120 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. धुळे जिल्हा रुग्णालयात एमआरआय व सिटीस्कॅन मशिनसाठी एक महिन्यांच्या आत निधी उपलब्ध करणार अशीही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. येथील चक्करबर्डी येथे आयोजन भव्य अटल आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. धुळे शहर व जिल्ह्याच्या विकासात महत्वपुर्ण भुमिका अदा करणार्या सुलवाडे-जामफळ योजनेबाबत त्यांनी अनुकुल मत व्यक्त केले. भव्य अटल आरोग्य शिबीरात यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, खा. हिना गावीत, आमदार स्मिता वाघ, आ.अनिल गोटे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धुळ्यात विकासाची गंगा आणणार
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, धुळ्याचा विस्तार झपाट्याने होते आहे. परिणामी नागरिकांच्या समस्या वाढत आहे. धुळेकरांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात विकासाची मालिका सुरू करावी लागणार आहे. असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारतर्फे आयुष्यमान नावाची योजना सुरु होत आहे. त्याअंर्तगत 50 कोटी रुग्णांना त्यांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.