धुळ्याच्या निवासी डॉक्टरास मारहाण केल्याचा निषेध

0

पाचोरा । धुळे येथील शासकिय वैद्यकिय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांना रविवार 12 मार्च 2017 रोजी अज्ञात समाज कंटकाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अशा अज्ञात मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त करत समाज कंटकांवर व्यक्तींवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाचोरा मेडीकल असोसिएशनतर्फे येथील पोलिसात निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे: धुळे येथील निवासी अस्थिरोग तज्ञ डॉ. म्हामूणकर यांना 12 मार्च 2017 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सदर भ्याड हल्ल्यात सरकारी वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहण यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कायम स्वरूपी निकामी होण्याची भिती असून त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून समजते. सदरील घटना दुदैवी व गंभीर असून या घटनेचा पाचोरा मेडीकल असोसिएशन पाचोरा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे. या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील सर्व डॉक्टर्स संघटना, शासकीय वैद्यकिय अधिकार्‍यांनी, आरोग्य सेवा व प्रशासकीय कामकाजाचा निषेध केला आहे. अश्या घटना वारंवार घडत असून शासनाने ठोस कार्यवाही करावी व भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून उपाय योजना कराव्यात आणि डॉक्टर संरक्षण कायद्यात बदल करून त्यांच्यावर अधिक करावाई करण्यात यावा. तसेच या घटनेचा गुन्हेगारांना योग्य ती कारवाई करावी.