धुळे- महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिस स्थापना दिवस सप्ताहाचे औचित्य साधून पोलिस व जनता, विद्यार्थी, तरुण, तरूणी यांच्यात समन्वय व सुसंवाद राहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, रोजी सकाळी 9.30. वाजता शाहुराजे नाट्यगृहात धुळ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी महिला सुरक्षितता या विषयावर जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे मार्गदर्शन करणार आहेत. प्रसंगी अॅड.चैतन्य भंडारी हे ‘सायबर सिक्यरीरटी’ यावर मार्गदर्शन करतील तसेच प्रा.उल्हास चव्हाण, पालेशा कॉलेजचे उपप्राचार्य हे ‘विद्यार्थीनींचा मानसिक विकास’ या विषयावर भाष्य करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.