धुळ्यातील आझाद नगर भागातून 10 लाख 50 हजारांचे गो मांस जप्त

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; एक अटकेत ; सहा संशयीत पसार

धुळे- गायीसह बैलांची बेकायदा करून मांसाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील आझाद नगर पोलिस ठाणे हद्दीतील माधवपुरा परीसरातील अलजोहरा क्लिनीकसमोरील नियाज अन्सारी या संशयीताच्या वाड्यावर सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास छापा टाकून 10 लाख 51 हजार 822 रुपये किंमतीचे गाय व बैलांचे मांस तसेच 16 जिवंत गुरे व एक लाख 66 हजार 820 रुपयांच्या रोकडसह मांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप बोलेरो वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैधरीत्या गुरांची कत्तल करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून फैसल खान फारुख खान यास अटक करण्यात आली असून संशयीत आरोपी नियाज अन्सारी (धुळे) आणि सलमान खान (मालेगाव) यांच्यासह अन्य चार हेल्पर पसार झाले आहेत. संशयीतांविरुद्ध महेंद्र कापूरे यांच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, रामकृष्ण सोनवणे, अनिल पाटील, महेंद्र कापूरे, नितीन मोहने, रफिक पठाण, गौतम सपकाळे, मनोज पाटील, चेतन कंखरे, विजय सोनवणे, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.