धुळ्यातील चालकाची उधना बस स्थानकात एसटीतच आत्महत्या

Dhule Driver Commits suicide in bus at Udhna Bus Station धुळे : धुळे शहराजवळील नगावबारी गावातील रहिवासी असलेल्या बस चालकाने एस.टी.मध्ये आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुजरात राज्यातील उधना बसस्थानकात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. बस चालकाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नवीन पाटील (45, रा.नगावबारी, धुळे) असे मयत बस चालकाचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास केली आत्महत्या
नवीन पाटील यांना सुरत ड्युटी असल्याने ते धुळ्याहून सुरतपर्यंत बस घेवून गेले व तेथे गेल्यानंतर त्यांनी रात्री वाहकासोबत जेवणे केले मात्र मध्यरात्रीच्या सुमारास धुळे-सुरत एसटीबस मध्येच मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफास घेतला. बसचालकाने आत्महत्या का केली याचे कारण कळाले नाही. रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मयत बस चालकाचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.