धुळ्यातील पंजाब नॅशनल बँकेतून दहा लाखांची रोकड लंपास

0
धुळे :– शहरातील सहा नंबर गल्लीतील बोरावल खुर्द पंजाब नॅशनल बँकेतून दहा लाखांची रोकड भर दिवसा चोरट्यांनी लांबवल्याची घटना 10 रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
मंगळवारी सहा ते आठ अज्ञात सुटा-बुटातील आरोपींनी बँकेत प्रवेश करीत बँकेत खाते उघडायचे आहे, फार्म द्या, फार्म कसा भरायचा म्हणत वाद घालता तर दुसर्‍याने खाते बंद करण्यावरून गोंधळ घातला. आरोपींनी बँकेतील ग्राहकांसह कर्मचार्‍यांचे लक्ष वेधत अन्य आरोपींनी बँकेचे दरवाजे बंद करून धाक दाखवत 10 लाखांची रोकड अलगदपणे लांबवल्याचे सांगण्यात आले.