जळगाव/धुळे । धुळ्यातील आग्रा रोडवरील राजस्थान लॉजमध्ये एका महिलेचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती. खुनानंतर संशयीत पसार झाला होता मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे. मयत महिला जळगावच्या पिंप्राळ्यातील चौधरीवाडा येथील रहिवासी असून आरोपीशी असलेल्या अनैतिक संबंधातून ती ब्लॅकमेल करीत असल्याने तिचा मारल्याची कबुली संशयिताने दिली आहे. दरम्यान, योगिता मोहन शिरसाठ (32, पिंप्राळा, जळगाव) असे मयत महिलेचे तर नितीन विश्वनाथ पाटील (34, पाळधी खुर्द, ता.धरणगाव, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशय आल्याने महिलेचा खून झाला उघड
आग्रा रोडवरील राजस्थान लॉजमध्ये एका जोडप्याने पती-पत्नी असल्याचे सांगत सोमवारी रूम बुक केली होती. संबंधित इसमाने सुरेश निळे (रा.वरखेडे) असे सुरुवातीला आपले नाव सांगत निळे नावाचे अस्पष्ट आयडी प्रुफ दिले होते होते रात्री हा ईसम औषधी घेण्यासाठी बाहेर जातो, असे सांगून बाहेर पडला मात्र बराच वेळ झाल्यानंतरही हॉटेलमध्ये न परतल्याने हॉटेल्स स्टॉपला संशय आल्यानंतर त्यांनी खोली तपासली असता या इसमासोबत आलेल्या महिलेचा गळा चिरल्याचे व ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक प्रमोद कुदळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तगादा लावल्याने काढला काटा
समजलेल्या माहितीनुसार, मयत योगीता शिरसाठ याचे आरोपी नितीन पाटीलसोबत सुमारे पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते व दोन बिघे शेती नावावर करण्यासाठी संबंधित महिला तगादा लावत होती शिवाय आरोपीच्या घरीदेखील अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने प्रपंचात कौटुंबिक कलह वाढल्याने आरोपीने महिलेचा काटा काढण्याचे ठरवत तिला लग्नाला जायचे सांगून धुळ्यात बोलावले. महिला पिंप्राळ्यातून तर आरोपी पाळधीहून धुळ्यात आले. दोन लॉजमध्ये गेल्यानंतर ओळखपत्र मागण्यात आले मात्र ते नसल्याने आरोपीने रीक्षा चालकाचा विश्वास संपादन करून त्याच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत काढून तीन लॉज चालकाला देत 101 क्रमांकाची खोली मिळवली. याचवेळी उभयंतांमध्ये खटके उडाल्याने आरोपीने सुरीने महिलेचा गळा चिरत तिचा खून केला व पळ काढला. आरोपीने जाताना महिलेचा मोबाईल नेला मात्र सुदैवाने तो एका रीक्षात पडल्याने चालकाने सांभाळू ठेवला होता त्यातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर लॉजचे रजिस्टर तपासल्यानंतर संशयीताचा नाव व मोबाईल नंबरची पडताळणी केली असता तो मयत महिलेचा मोबाईल नंबर निघाला व तो एका रीक्षा चालकाकडे असल्याचे कळताच त्या रीक्षा चालकाला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. या मोबाईलमध्ये आरोपीचे महिलेसोबतचे फोटो असल्याने गुन्ह्याचा उलगडा होवून काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळता आल्या, असे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे म्हणाले. दरम्यान, मयत विवाहितेच्या 8 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले असून तिला अक्षय व मयूर अशी दोन मुले असल्याचे सांगण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
खून केल्यानंतर आरोपी पसार झाला होता मात्र महिलेच्या मोबाईल क्रमांकाआधारे त्याचा शोध घेण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, सहाय्यक निरीक्षक डी.ए.पाटील, सहा.निरीक्षक हिरालाल बैरागी, मुक्तार मन्सुरी, कबीर शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, गफ्फार शेख आदींच्या पथकाने केली.