धुळ्यातील माजी नगरसेवक विनायक शिंदेविरूद्ध गुन्हा

0

धुळे- महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या एकीकडे फैरी झडत असताना दुसरीकडे गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. नगरसेविका पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना माजी नगरसेवक विनायक शिंदेविरुद्धही मोहाडी पोलिसात पाच वर्षांपूर्वी झालेल्या लुट प्रकरणी तसेच शिविगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

तिघांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा
माजी नगरसेवक विनायक शिंदे, विनायक धापटे, गुलाब देवरे यांनी जुलै 2013 मध्ये तक्रारदाराच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटून नेले होते तसेच धक्काबुक्की केली होती शिवाय 2 रोजी रात्री विनायक शिंदे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदार वामन ठाकूर यांनी केला आहे.