धुळ्यातील लाचखोर वनपाल एसीबीच्या जाळ्यात

धुळे : वनविभागाने माल वाहतुकीचे जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी 15 हजारांची केलेली लाच मागणी धुळे वनविभागाच्या वनपालाच्या अंगलट आली असून धुळे एसीबीच्या पथकाने संशयीतास अटक केली आहे. सुनील आधार पाटील (57, रा.प्लॉट नं.13 ब, जानकीराम नगर, जुने धुळे, धुळे) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

लाच मागणीचा अहवाल येताच कारवाई
धुळ्यातील 47 वर्षीय तक्रारदाराचे फॉरेस्ट कार्यालयात माल वाहतुकीचे वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडण्यासाठी संशयीत आरोपी तथा वनपाल सुनील पाटील यांनी 6 मे रोजी 15 हजारांची लाच मागणी केली होती मात्र लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती. धुळे एसीबीकडे याबाबतचा अहवाल प्रापत झाल्यानंतर संशयीतास मंगळवारी दुपारी कार्यालयातून अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक
प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मणजीतसिंग चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.