धुळे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत 1553 खटले निकाली काढण्यात आले. मोटार अपघात प्रकरणांमध्ये 1 कोटी 99 लाख 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जे. ए. शेख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. सी. बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यालोक अदालतीत एकूण 4212 खटले ठेवण्यात आले होते.त्यापैकी 1553 खटले निकाली काढण्यात आले.
लोक अदालतीसाठी एकूण 9 पॅनेल
लोकअदालतीसाठी एकूण 9 पॅनेल गठित करण्यात आली होती. यापॅनेलच्या09समोर खटल्यांची सुनावणी झाली. पॅनेल प्रमुखांमध्ये जिल्हा न्यायाधीश एस. एम.देशपांडे, ए. एच. सय्यद, आर. टी. नागरे, एम. ए. मोटे, के. आर. राजपूत,ए. एस. नलगे, एस. डी. चक्कर, डी. पी. काळे, एस. यू. न्याहारकर यांचा समावेश होता.निकाली निघालेल्या खटल्यांची संख्या अशी : फौजदारी- 123, कलम 138 खालीलप्रकरणे- 52, बँक- 4, मोटार वाहन अपघात प्रकरणे- 181, कामगार- 9, कौटुंबिक वाद-30, दिवाणी- 14 एकूण 413. न्यायालयात दाखल नसलेली (प्री लिटिगेशन) : बँक वसुली-50, ग्रामपंचायत- 1089 एकूण 1140. लोक अदालतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक प्रवीण क्षिरे, प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. वाघ, सहाय्यक एम.बी. भट, लिपिक बी. आर. जोशी, प्रदीप पाटील, भरत गोरे यांनी परिश्रम घेतले. या लोक अदालतीस जिल्हा वकील संघाच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले. या खटल्यांमध्ये कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज, पाणी देयकांबाबतची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळून), अपघात न्यायाधिकरणा बाबतची प्रकरणे ठेवण्यात आली होती.