दोन लाख 10 हजारांची रोकड जप्त ; गुन्हे उघडकीस येणार
धुळे- शहरातील मुस्लीम नगरातील रहिवासी अब्दुल कलीम मोहम्मद ईस्लाम अन्सारी (38, मुन्शी मशीदजवळ, हुसेन हॉटेलमागे) हे कुटुंबासह लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून सव्वातीन लाखांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुप्त माहितीनुसार आरोपींना अटक
पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुबेर चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तेजाळे, कॉन्स्टेबल जोयेब पठाण, प्रेमराज पाटील, शेंडे, माळी यांनी गुप्त माहितीच्या आधारे शाहरूख शेख उर्फ बोबड्या अजीज शेख (28, मारोती मंदिराजवळ, आझादनगर, धुळे), मोसीन अब्दुल रहेमान मलाड (30, मिल्लत नगर, अबुबखर मशीदजवळ, आझादनगर, धुळे) यांना अटक केली असून अन्य अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. आरोपी शाहरूख शेख याच्या ताब्यातून दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीच्या ताब्यातून दहा हजारांची रोकड जप्त करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.