धुळ्यातील स्वस्तिक चित्रपट गृहावर छापा : 15 आंबट शौकीन ताब्यात

0

अश्‍लील चित्रपट सुरू असताना पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुळे- शहरातील राणा प्रताप चौकातील स्वस्तिक चित्रपट गृहात मंगळवारी स्थानिक अन्वेशन विभागाच्या पथकाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी 15 आंबट शौकीनांना ताब्यात घेण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे परीसरात एकच धावपळ उडाली होती. अनेक आंबट शौकीन जीव घेवून पळत सुटले होते. पथकाने चित्रपट गृहातील चित्रपट दाखविण्याचे यंत्र, पेनड्राईव्ह आदी साहित्य जप्त केले आहे शहरातील स्वस्तिक चित्रपट गृहात अश्लील चित्रपट सुरु असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने पथकाने कारवाई केली. यावेळी पथकाने अश्लील चित्रपट पाहणार्‍या 15 आंबट शौकीनांना ताब्यात घेतले. पथकाने घटनेचा पंचनामा केला. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, हवालदार नथा भामरे, गौतम सपकाळ, मनोज मागुल, राहूल सानप यांचा समावेश होता.