धुळ्यातील 11 लाखांच्या घरफोडीची उकल : अट्टल आरोपी जाळ्यात

20 हजारांच्या मंगळसूत्रासह 11 लाख 28 हजारांची रोकड जप्त

धुळे : शहरातील जामचा मळा भागातील बंद घर फोडून चोरट्यांनी 11 लाख 10 हजारांची रोकड व 11 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले होते. चाळीसगाव रोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही धाडसी घरफोडी सर्‍हाईत गुन्हेगार अकबरअली उर्फ जलेल्या कैसरअली शहा (जामचा मळा, धुळे) याने केल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर संशयीतास अटक मढी, ता.बारडोली येथून शनिवार, 4 रोजी पहाटे अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 11 लाख 28 हजारांची रोकड व 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व कानातील झुमके जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक योगेश राऊत, रफिक पठाण, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींच्या पथकाने केली.