धुळ्यातून चोरट्यांनी दहा चाकी ट्रक लांबवला

0

धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील जामचा मळा भागात उभा असलेला दहा चाकी ट्रक अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लांबवला. ट्रक मालक नदी यांनी चाळीसगाव रोड पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणेने ट्रकचा शोध सुरू केला आहे. ट्रक क्रमांक (एम.एच.18 के.0898) हा अलखेरा हायस्कूलमागील जामचा मळा भागात लावला असताना चोरट्यांनी लांबवला.

लाखो रुपये किंमतीचा ट्रक चोरट्यांनी लांबवल्यानंतर खळबळ उडाली. अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश सपकाळे यांना तपासाच्या सूचना केल्यानंतर खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट करण्यात आले आहे तर या भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच या टोल नाक्यांवरून माहिती काढली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.