धुळ्यात अडीच लाखांच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला

0

धुळे- देवपूर भागातील पंचाळवाडा, हुसेनिया चौकातील रहिवासी व किराणा व्यावसायीक संजय छगन अहिरराव (48) गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील अडीच लाखांची रोकड लांबवली. 1 रोजी रात्री अहिरराव कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अहिरराव यांच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.