धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
धुळे : शहरातील शंभर फुटी रोड परीसरातील हिदायत मशीदीमागे चारचाकी वाहनांसह रीक्षांमध्ये घरगुती वापराच्या सिलिंडद्वारे अवैधरीत्या गॅस रीफिलींग केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी धडक कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळावरून आठ सिलिंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजनकाटा, नोजल व नळ्या आदी 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी मोईन उस्मान पिंजारी (26, जामचा मळा, शंभर फुटी रोड, धुळे) याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी राहुल सानप यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, नथ्थू भामरे, रफिक रशीद पठाण, संदीप थोरात, वसंत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, तुषार पारधी, राहुल सानप, श्रीशैल पाटील, चालक केतन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.