धुळ्यात अवैध विदेशी दारूची तस्करी रोखली : 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

धुळे : मध्यप्रदेशातून गुजरातकडे जाणारा विदेशी दारुचा ट्रक मोहाडी पोलिसांनी जप्त करीत 52 लाखांच्या अवैध विदेशी दारूसह सुमारे 20 लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह एकूण 72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री उशीरा करण्यात आली़ 10 चाकी ट्रकच्या माध्यमातून अवैध दारू खोक्यात पॅक करून तिची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कारवाई करण्यात आली. ट्रक मध्यप्रदेशाकडून गुजरातकडे जात होता़