साठा बनावट असल्याची शक्यता ; कृषी विभागाच्या कारवाईने खळबळ
धुळे- शहरातील देवपूर परीसरातील प्रमोद नगरातून कृषी विभागाने सात लाख 85 हजारांचा बेकायदा खतांसह बियाण्यांचा साठा जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. प्रभाकर गंजीधर ठाकरे (धाडरे, त.धुळे) हा पसार झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई कृषी अधिकारी पी.एम.सोनवणे, मोहिम अधिकारी आर.एम.नेतनराव, धुळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.एस.चौधरी, आर.आर.भोसले, कृषी विस्तार अधिकारी स्मिता पाटील, डी.व्ही.देवरे यांच्या पथकाने केली. पश्चिम देवपूर पोलिसात संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा जप्त साठा बनावट आहे वा नाही? याबाबत तपासणीचा अहवाल आल्यानंतर काही सांगता येईल? असे सूत्रांनी सांगितले.