धुळ्यात आमदार अनिल गोटेंचे वाहन फोडले तर शेंदुणीीत पैसे वाटपाच्या संशयातून एका वाहनाच्या काचा फोडल्या

0

जळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, 9 रोजी सकाळी शांततेत मतदानाला सुरूवात झाली असून निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री पैसे वाटपाच्या संशयावरून सोयगाव रस्त्यावर एका वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याचे सांगण्यात आले तर सर्वाधिक चुरस व लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्या चारचाकी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयीतांनी दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे.

धुळ्यात आमदारांचे वाहन फोडले
आमदार अनिल गोटे हे शनिवारी रात्री लोकसंग्रामच्या कार्यालयात बसले असताना शनिवारी रात्री 10.15 वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी चारचाकी (एम.एच18, ए.जे. 3366) वाहनावर दगडफेक करून पळ काढला. घटनेचे वृत्त शहरात कळताच मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, धुळे महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीला शांततेत सुरुवात झाली असून 74 जागांसाठी 355 उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील नगावबारी येथील शासकीय गोदामात सोमवार, 11 रोजी मतमोजणी होणार आहे.