पांझरा नदी काठावरील मंदिरे पाडल्याचा राग
धुळे:- शहरातील पांझरा नदी काठावरील मंदिरे पाडल्याच्या कारणातून शहरातील जुने धुळे भागातील नागरीकांनी आमदार अनिल गोटे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शनिवारी काढली. पांझरा नदी काठाला लागून दोन्ही रस्ते समांतर करण्याचे काम आमदार गोटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामासाठी नदी काठावरील महाकालेश्वर तसेच अनेक छोटी-मोठी मंदिरे पाडण्यात आल्याने आमदार गोटेचा निषेध व धिक्कार रहिवाशांनी केला.