धुळ्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

0

धुळे : शहरात चोर्‍या घरफोडय़ाचे सत्र सुरूच आहे. वलवाडी शिवारातील अयोध्या नगरात रविवारी पहाटे एकाच रात्री सलग ३ घरात घरफोडी झाली. यात एका घरातून सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. मात्र सुदैवाने इतर दोन घरात चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. सकाळी ही घटना उघडकीस आली.

देवपुरातील वलवाडी शिवारातील अयोध्या नगरात माजी सैनिक विनोद गुलाबराव वानखेडे राहतात, ते शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेले होते. याची संधी साधत चोरट्याने त्यांचे बंद घर फोडले. त्यांच्या घराशेजारी संजय श्रीराम कासार आणि सोंजे नामक व्यक्तींचे सुध्दा बंद घर चोरट्याने फोडले. मात्र या दोन घरातून चोरट्याच्या हाती काहीही मिळाले नाही. घटनेची माहिती कळताच पश्चिम देवपूरचे पोलीस घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला.