धुळ्यात औषधोपचाराच्या बदल्यात आदिवासी महिलेकडे शरीरसुखाची मागणी! 

0
धुळ्यातील भाऊसाहेब हिरे सरकारी रुग्णालयातील प्रकार
आ.अनिल गोटे यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप
निलेश झालटे ,नागपूर-पीक कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपचारासाठी सरकारी रुग्णालयात शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप ज्येष्ठ आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत केला. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे सरकारी रुग्णालयात औषधांच्या बदल्यात आदिवासी भिल महिलेकडे कर्मचाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी गोटे यांनी विधानसभेत प्वाईंट ऑफ इंफर्मेशन अंतर्गत केली.
विधानसभेत बुधवारी सकाळच्या सत्रात आ. अनिल गोटे यांनी धुळ्यातील सरकारी दवाखान्यातील या संतापजनक प्रकरणाला वाचा फोडली. एका रुग्नाच्या औषधाच्या बदल्यात दवाखान्यात नातेवाईक म्हणून आलेल्या आदिवासी महिलेकडे तिथल्या कर्मचाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली, अशी माहिती गोटे यांनी सभागृहात दिली. तर भिर नावाच्या एका इसमाचे उपचार या रुग्णालयात सुरु असून त्याच्या उपचाराच्या बदल्यात त्याची पत्नी नर्मदा भिर हिच्याकडून रक्ताच्या बदलाच्या संडास आणि फारशी सायफसफाई करून घेण्याची कामे केली असल्याचेही गोटे यांनी सांगितले.
हा प्रकार अतिशय गंभीर असून या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गोटे यांनी केली. यावर अध्यक्षांनी शासनाने कारवाई कारवाई असे निर्देश यावेळी दिले.