धुळ्यात कचरा डेपोला आग ; 12 बंबांनी मिळवले नियंत्रण

0

धुळे – शहरातील वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीचा जोर कमी असलातरी काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आग विझवण्यासाठी धुळे महापालिकेसह दोंडाईचा, अमळनेर, शिरपूर तसेच नजीकच्या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असलेतरी अधून-मधून काही ठिणगी पुन्हा आग पकडत असल्याने बंबांकडून पाण्याचा फवारा मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तब्बल 12 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.