धुळे । महापालिका करवसूली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी, खून आणि चोर्या, किडनॅपिंग, जाळपोळ, खंडणी यासह विविध गंभीर 35 गुन्ह्यातला संशयित रफिकोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा शहरात आज मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निर्घृण खून झाला. वर्दळीच्या पारोळा रोडवर असलेल्या कराचीवाला खुंटाजवळ गोपाल टीसमोर ही थरारक घटना घडली. दरम्यान या खूनाची माहिती धुळ्यात एक क्षणात वार्यासारखी पसरली होती. काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात गुड्डयाचा जामिन झाला होता.
त्यामुळे तो शहरात बिनधास्तपणे वावरताना दिसत होता. आठवड्यापासून शहरातल्या विविध भागात बुलेटवरची त्याची स्वारी चर्चेचा विषय ठरली होती. विविध गुन्ह्यातून त्याने रग्गड पैसा कमविल्यामुळे त्याचे राहणीमानही उंचावले होते. जळगाव, नगर, नाशिक, मुंबई अशा ठिकठिकाणी त्याचे कनेक्शन असल्यामुळे आणि तेथील वादातून तो अनेक टोळ्यांच्या हिटलिस्टवर होता. अशात आज पहाटेच्या सहाच्या सुमारास तो गोपाल टी हाऊसवर आला होता .गुड्डया च्या झालेल्या खुनाच्या पार्श्भिमीवर दोन गटात गँगवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी चोक बंदोबस्त लावला होता. दोघी पार्ट्या सराईत गुन्हेगार असून शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.