धुळे : गणपती बाप्पा मोरया..,मंगलमूर्ती मोरया … आला..रे..आला.. बाप्पा..आला… या सारख्या एक ना अनेक गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण करीत डोल तास्याचे गजरात विघ्नहर्त्या गणरायाचे शहरासह जिल्ह्यात भरात वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आली तर मंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली. अनेक जण मुहूूर्त पाहून स्थापना केली तर संध्याकाळपर्यंत मुख्य मंडळाच्या गणरायाची स्थापना होणार असल्याचे चित्र आहे. ढोल ताशांचा गजर, लेझीम पथकांचे ठेके लक्षवेधी ठरत आहे.
सकाळी बाजारपेठेत गणेश मूर्ती व इतर साहित्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. अबालवृद्ध व महिला वर्गही बाजारात गणेशाची मूर्ती खरेदी करण्यास आले असल्याचे विविध भागात दिसून आले.
सतोषी माताचौक, फुलवाला चौक, आग्रारोड, वाडीभोकर रोड,मोहाडी येथे गणपती मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी ९ वाजेपासून या ठिकाणी पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.