धुळ्यात चोरीच्या वाहनाची विल्हेवाट लावणारे चौघे अटकेत

0

मोहाडी पोलिसांची कामगिरी : दोन लाख 42 हजारांची वाहने जप्त

धुळे- मोहाडी उपनगर शिवारात मध्यरात्रीच्या वेळी चोरीच्या मोटारसायकलांची विल्हेवाट लावणार्‍या चार जणांना मोहाडी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनांसह दोन लाख 42 हजार रुपये किंमतीचे वाहने जप्त करण्यात आली. मोहाडी उपनगरातील साबण कारखानाजवळ चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अंधारात वाहन लावून पाळत ठेवली होती. या वेळी सुमारे सात ते आठ जण अंधारात उभे हेाते. एका मिनी टॅम्पोमधून त्याची वाहतूक करण्याचे प्रयत्न केला जात असताना पोलिसांची चाहूल लागताच इतर संशयित पसार झाले. तर पोलिसांनी काही जणांना पाठलाग करुन चार जणांना पकडले. हे चौघेही पळ काढताना पडल्यामुळे जखमी झाले आहेत. विचारणाा केल्यावर त्यांनी आपली नावे विकास शांताराम शिंगाडे, कपिल बाळू आव्हाडे, प्रशांत जनार्दन गावडे, कन्हैया तुळशीराम बाविस्कर अशी सांगितली. त्यांच्याकडून पोलिसानी विनाक्रमांकाच्या चार मोटारसायकली व टॅम्पो जप्त केला आहे. मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी अभिषेक पाटील, बाबुलाल माळी, दाभाडे, महाले व भामरे यांच्या पथकाने कारवाई केली.