धुळ्यात जबरी लूट : दोघे आरोपी धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात

मारहाण करीत लूटले : दोघे आरोपी धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात

धुळे : पांझरा नदी किनारी असलेल्या स्वच्छतागृहात 30 वर्षीय तरुणाला रीक्षातून आलेल्या दोघा संशयीतांनी मारहाण करीत तीन ग्रॅमची अंगठी लांबवली होती. 4 जून रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपींना गजाआड करण्यात आले. रीक्षा चालक सुरज अशोक कर्डक (24, गायकवाड चौक, जुने धुळे, धुळे) व जयेश रवींद्र खरात (गायकवाड चौक, जुने धुळे, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
तक्रारदार अतुल राजेंद्र गर्दे (30, चितोड रोड, धुळे) हे 4 रोजी पांझरा नदी किनारी स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्यांना रीक्षातून आलेल्या दोन संशयीतांनी लोखंडी सळईने मारहाण केली होती तसेच हातातीन ग्रॅमची अंगठी लांबवली होती. धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ.प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दादासाहेब पाटील, डी.धनवटे, एएसआय भिकाजी पाटील, हवालदार अब्बास शेख, दिनेश परदेशी, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, कुंदन पटाईत, गौरव देवरे, मनीष सोनगीरे, निलेश पोतदार, प्रवीण पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, गुणवंत पाटील, शाकीर शेख, प्रसाद वाघ, चालक हवालदार सुभाष मोरे आदींच्या पथकाने केली.