धुळे । शहरातील साक्रीरोडचे रूंदीकरण करण्यात येत असून रस्ता मोजमापाच्या 28 मीटर दरम्यान येत असलेल्या तब्बल 186 अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चार जेसीबींच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात दुकानदारांसह रहिवाशांनी स्वतःहून काढले अतिक्रमण आले. मोतीनाला ते सुरेंद्र डेअरी दरम्यान करण्यात येत असलेल्या या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत रहदारीस अडथळा येवू नये याकरीता पोलिसांच्या बंदोबस्तासह शहर वाहतुक शाखेचे पथकही याठिकाणी तैनात करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुर्वीच संबंधीत अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने आज सक ाळी स्थानिक रहिवाशांनी तसेच लहान व्यापार्यांनी आपापले अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. या 186 अतिक्रमणांमध्ये काही दुकाने तर काही रहिवासी घरांचा समावेश आहे.
मोजपट्टीच्या सहाय्याने मोजणी करुन ठरविली हद्द
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन मोहिम पथकात 20 कर्मचार्यांचा समावेश असून 4 जेसीबींच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात येत होते. 28 मीटरच्या या मोजमापात दुजाभकाचाही समावेश असल्याने मोजमापाविषयी नागरिकांच्या मनात शंका होत्या. रहिवाशी व दुकानदार हे स्वतः मोजपट्टीच्या सहाय्याने मोजणी करुन हद्द ठरवत होते. अनेक दुकानदार व रहिवाशांनी स्वतःहून ही अतिक्रमण काढून घेतली. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलनात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये याकरीता शहर पोलिसांसह वाहतुक पोलिसांचाही चोख बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या देखरेखीखाली शांततेत ही कार्यवाही सुरु होती. अतिक्रमण काढतांना रस्त्यात येणारी झाडे तसेच इलेक्ट्रिक पोलमुळे अडथळा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधीत विभागाचीही मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असल्याचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम.ए.शहा, शाखा अभियंता धमेंद्र झाल्टे, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता एजाज शहा यांच्यासह 20 जणांच्या पथकाने ही अतिक्रमण मोहिम यशस्वीपणे राबविली.