धुळे- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहराजवळ असलेल्या हॉटेल रेसिडन्सी पार्कसमोर रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भाजीपाला घेवून जाणारा ट्रक व लग्नाचे वर्हाड घेवून जाणार्या लक्झरीत भीषण अपघात होवून लक्झरीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहाडी पोलिस ठाण्यात शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी हवालदार जे.एस.ईशी यांच्या फिर्यादीनुसार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दोंडाईचातील प्रवाशाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातून लग्नाचे वर्हाड चोपड्याकडून सुरतकडे लक्झरी (जी.जे.14 डब्लू 0819) ने जात असताना धुळ्याजवळ हॉटेल रेसीडन्सीपार्क समोर एका ट्रकने जोरदार धडक दिली. रात्री दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघात लक्झरीतून प्रवास करणारे गणेश शंकरलाल शर्मा (रा.दोंडाईचा, जि.धुळे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघात जखमी झालेल्या रुग्णांना तोलनाका व खाजगी रुग्णवाहिनीतून धुळे जिल्हा रुग्णाालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींमध्ये आरीफखान कबीरखान (46), शरीफखान कबीरखान (दोघे रा.धानोरा, ता. चोपडा), अरबाज यासीन खान (20, रा.पाळधी) यांचा समावेश आहे तर ट्रक चालक नासीर सरफोद्दिन खान (गाडोदा, हरीयाणा), तस्लीम बेग, खलील बेग (रा. चोपडा), बशिर खान (धानोरा), अन्वर सलीम शेख (रा.दोंडाईचा, ता. जि. धुळे), मुजफर अली अकबर अली (रा. धानोरा), शाजीद अली (रा.अडावद), फीरोज उस्मान खान (रा.रावेर), रशीद फकरी शेख (रा.चोपडा), रफीक कबीर खान (रा.फैजपूर) आदींचा समावेश आहे. किरकोळ जखमींना उपचार करुन घरी सोडण्यात आले.