धुळ्यात तंबाखूच्या पुडीवरून तरूणाचा खून

0

धुळे । शहरातील भीमनगरातील राजीव गांधी नगरात किराणा दुकानवार तंबाखूच्या पू़डी विकत घेण्यावरुन मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास झालेल्या हाणामारीत संदीप विजय ठाकुर(21) राहणार भीमनगर परिसर हा जखमी झाला,त्याला उपचारा साठी जिल्हा रुग्नलायात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास मृत्यु झाला. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी दगडफेक करत संययिताचे घर जाळून टाकले.तंबाखूची पू़डी 12 रुपयांची असताना संदीप ठाकुरक़डे 10 रुपये असल्याने 2 रुपयांच्या विषयावरुन दुकानदराशी वाद झाला. त्याचे रूपांतर हानामरित झाले त्यात त्याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

नातलगांची प्रोव्हिजनवर दगडफेक
या घटनेनंतर मृत संदीपच्या संतप्त नातलगांनी चंद्रकांत प्रोव्हिजनवर दगडफेक करीत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांना खबर मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रमेशसिंह परदेशी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे, उपनिरीक्षक नाना आखाडे,डि.आर.सपकाळ, आर.जी.माळी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.संशयित आरोपी चंद्रकांत चव्हाणसह पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.या घटनेचे पडसाद मध्यरात्रीतून पुन्हा उमटले. संतप्त जमावाने संदीपच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चव्हाण कुटुंबियांचे घर रात्रीतून जाळून टाकले.