धुळे :- मोहाडी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल दहा चोरीची दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी संदीप ज्ञानेश्वर पाटील (20) आणि समाधान अर्जुन पाटील (22, दोघे रा़ बिलाडी ता़ धुळे) यांना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी याबाबत प्रसिद्ध माध्यमांना माहिती दिली.
मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्यासह अन्य उपस्थित होते़ दुचाकी चोरींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींनी देवपूर, पश्चिम देवपूर, धुळे शहर आणि आझादनगर येथून दुचाकी चोरल्याचचे सांगितले़ दोन लाख 95 हजार रुपये किंमतीच्या या दहा दुचाकी असून आरोपींकडून आणखी काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे.