धुळ्यात नशा येणार्‍या औषधांची विक्री : गुजरातचा तरुण जाळ्यात

धुळे : गुंगीकारक औषधांच्या बाटल्या (नशा येणार्‍या) विक्री करणार्‍या आरोपीच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आमिन शेख लाल शेख (29, कुमारवाडा, गांधीनगर, पॉवर हॉऊसजवळ, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून रेक्झॉन टी नावाच्या एकूण 42 हजार रुपये किंमतीच्या 300 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

यांनी केली कारवाई
शहरातील लोकमान्य हॉस्पिटल जवळील रस्त्यावर एक तरुण नशेच्या बाटल्या विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक निरीक्षक संदीप यांना मिळाली होती. त्यानुषंगाने अन्न, औषध प्रशासनाच्या पथकासह पोलिसांनी छापा टाकून गुजरातमधील आमीन शेखच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नासीर पठाण, हवालदार पंकज चव्हाण, हवालदार कैलास वाघ, नाईक भुरा पाटील, नाईक संदीप कढरे, कॉन्स्टेबल हेमंत पवार, कॉन्स्टेबल इंद्रजीत वैराट, प्रशांत पाटील, शरद जाधव आदींच्या पथकाने केली.