अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरेंच्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ
धुळे- शहरात गेल्या दोन दिवसात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस पकडण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे शहरातील आझादनगर, चाळीसगाव रोड, देवपूर पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून तीन आरोपींच्या मुसक्या आवळत तीन तलवारी जप्त केल्या. पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईने गुन्हेगारांच्य उरात धडकी भरली आहे. पोलिसांच्या गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू केल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
तीन तलवारींसह आरोपी जाळ्यात
आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीतील नाटेश्वर कॉलनीतून गणेश विक्रम सोनवणे (23, नाटेश्वर कॉलनी, वाखारकर नगर, धुळे) यास अटक करण्यात आली तर चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील हाफीज सिद्दीकी नगरातून तौसीफ शेख अजीज शेख (25, हाफीज सिद्दीकी नगर, धुळे) तसेच देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील भिलाठी परीसरातून आकाश जालीम गायकवाड (26, मरीमाता भिलाठी, धुळे) यांना तलवारीसह अटक करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पोलिसांनी कोम्बिंग राबवले.
यांचा कारवाईत सहभाग
धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक दत्ता पवार, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह कर्मचार्यांनी कोम्बिंग यशस्वी केले.