धुळ्यात भरदिवसा व्यापार्‍याकडील 27 लाखांची रोकड लंपास

Shocking! : Throwing chilli powder in the eyes, the cash of 27 lakhs was extended from the dust धुळे : कापूस विक्रीतून आलेली रक्कम घेवून घराकडे निघालेल्या व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून दुचाकीवरून आलेल्या चौघा लुटारूंनी भर दिवसा 27 लाखांची रोकड लांबवल्याची धक्कादायक शहरातील निरामय हॉस्पिटलजवळ शनिवार, 12 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून लुटारूंच्या शोधार्थ जिल्ह्यात पथके रवाना करण्यात आली आहेत.

पाळत ठेवून केली लूट
शहरातील खड्डाजीन घड्याळ फॅक्टरी परीसरातील माधव कॉलनीतील रहिवासी व तथा व्यापारी परेश पटेल (35) यांना कापूस विक्रीचे पेमेंट मिळाल्यानंतर ते शनिवार, 12 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.18-6503) ने घराकडे निघाले असतानाच घराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चार व्यक्तींनी परेश पटेल यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्याशी धक्काबुक्की करीत त्यांच्या ताब्यातील दुचाकी हिसकावून पोबारा केला.

पोलिस अधीक्षकांची धाव
परेश पटेल यांच्या दुचाकीच्या डिक्कीत 25 ते 27 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती पटेल त्यांनी पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस.ऋषिकेश रेड्डी, आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे शाखेचे कर्मचारी शोधपथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.