धुळ्यात मराठा आंदोलनकर्त्यांकडून खासदार गावित यांच्या वाहनाची तोडफोड

0
धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रविवारी दुपारी  हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हा नियोजनाचे बैठकीसाठी  आलेल्या नंदूरबारचे खासदार डाॅ. हिना गावीत याच्या वाहनावर हल्ला करत त्याची गाडीची तोडफोड केली.
हिना गावीत जिल्हा नियोजनची बैठक संपल्यानंतर जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातच  मराठा आंदोलकांनी त्याचा वाहनाची तोडफोड केली. यावेळी हिना गावीत वाहनातच होत्या. पोलीसांनी लाठीमार करत आंदोलकांना पागवत खासदार गावीत यांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी तोडफोड करणारे आदोलकाना अटक केली असून तणावपूर्ण शांतता आहे.
आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी गेले 21 जुलैपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे  रोज विविध प्रकारच्या आंदोलन केले जात आहे. रविवार मराठा क्रांतीतर्फे  मोर्चाच्यातर्फे कुटुंबीयांसह  ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
पालकमंत्र्यांना विरोध
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू होती. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री दादा भूसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, यावेळी काही आंदोलकांनी दादा भुसेच्या विरोधात घोषणा बाजी करत त्याचा विरोध केला.