धुळ्यात मराठा समाजातील 147 आमदारांची प्रतिकात्मक अत्यंयात्रा

0
एका मराठा आंदोलकाचा जिल्हाधिकारी  कार्यालयावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
धुळे : मराठा  आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी चार दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चातर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.  बुधवारी पाचव्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात  विधिमंडळात आवाज  न उठवणारे मराठा समाजातील सर्व आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहन करण्यात आले . या दरम्यान एका मराठा आंदोलकांनी  जिल्हाधिकारी  कार्यालयावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र जाभळे असे या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच आंदोलकाला ताब्यात घेतल्याने  पुढील अनर्थ टळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज आंदोलकांनी आक्रमक होत मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात आवाज न उडवणारे मराठा समाजातील सर्व 147  आमदारांची वाजत गाजत  अत्यंयात्रा काढली.   मनोहर टाॅकी जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुरवात झाली.
जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय , अस कस देत नाही. घेतले शिवाय रहात नाही. च्या घोषणांनी आंदोलकांनी  परिसर दणाणून सोडला. यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. आग्रा रोड, पाचंकदील, महापालिका , झाशीची राणी पुतळ्या मार्गे  अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली ,याठिकाणी सरकार व मराठा आमदारांचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्राचे दहन करण्यात आले. यावेळी मराठा मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार  राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील, मोहन नवले, संजय वाल्हे, हेमा हेमाडे, यासह मोठ्या संख्येने  महिला व पुरुष सहभागी झाले होते. दरम्यान प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले वर एका मराठा कार्यकर्तेनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  जितेंद्र जाभळे असे या आंदोलना