मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणातून घटना घडल्याचा अंदाज
धुळे:- शहरातील साक्री रोडवरील पदमनाभ नगरात आई आणि मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नाबाई भटू दुसाणे (वय 50) आणि तिचा मुलगा कल्पेश दुसाणे (वय 28) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकांची नावे आहेत.