मुल पळविण्याच्या संशयावरून मारहाण; तीन जणांचा मृत्यू

0

धुळे : मुलं पळवणाऱ्या  टोळीचा संशय आल्याने येथील आदिवासींनी ७  जणांना बेदम मारहाण केली दरम्यान ३  जण जागीच मृत झाल्याचे समजते तर २  जण गंभीर जखमी झाले असून २  जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. वृत्त कळताच पोलीस अधीक्षक एम रामकुमार घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईपाडा येथील ही घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात आणि गावात दहशतीचे वातावरण पसरल आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

याआधी औरंगाबाद आणि नंदुरबारमध्ये अशा घटना बाहेर आल्या होत्या. संशयित माणून दिसला की लोकही त्याला थेट मारहाणच करीत आहे. त्याची चौकशी करण्याची कोणी तसदी घेत नसल्याचेही समोर आले आहे.