धुळ्यात मोक्कातील संशयिताने पोलिसांवर केला हल्ला

0

धुळे – पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांवर सराईत गुन्हेगार सत्तार पिंजारी याने प्राणघातक हल्ला केला. सत्तार हा मोक्कामधील संशयित गुन्हेगार आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी जोएब रऊफ पठाण व प्रेमराज विक्रम पाटील यांना चोरीच्या घटनेत सत्तार मासूम पिंजारी (रा. अंबिका नगर) याची माहिती मिळाली. त्यामुळे ते दोघे सत्तार याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी सत्तारने पोलिसांशी अरेरावी केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण करत लोखंडी रॉडने पठाण वार केला. दोघा पोलिस कर्मचार्‍यांनी हा वार चुकवला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.