धुळे । महाराष्ट्र मेडीकल रिप्रेंटेटीव्ह असोसिएशनच्या आवाहनानुसार राज्य भरातील वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. धुळ्यात देखील मोठ्या संख्येने वैद्यकीय विक्री प्रतिनिधी या संपात सामील होत, मोर्चा काढण्यात आला. हा संप 8 तासाच्या कामांचे सुधारीत वेळापत्रक जारी करावे, एस.पी.ई. अॅक्ट 1976 कायद्याची अंमलबजावणी करावी, किमान वेतन 20 हजार प्रति महिना व महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यासह पीएफ, ईएसआयसीचे फायचे क र्मचार्यांना मिळावे. या मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी संघटनेचे सेक्रेटरी अजय चौधरी, योगेश माळी, सचिन पारोळोकर, प्रशांत वाणी, एल.आर.राव आदी उपस्थित होते.