धुळ्यात व्यापार्‍याचे घर फोडले

0
धुळे:- शहरातील मालेगाव रोड परीसरातील एका दुकानदाराच्या घरी काल मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी मोठा डल्ला मारला घरफोडी केल्याने खळबळ उडाली. घराचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगाव रोडवरील सुगंध नगर प्लॉट नं. 64 मध्ये राहणारे व्यापारी कुंदन ईश्‍वरलाल चौधरी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते ही संधी साधून  चोरट्यांनी काल मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरी हात साफ केला. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण पांढरकर, हवालदार शंकर महाजन, जोएब पठाण, संदीप कढरे आदींसह श्‍वानपथक घटनास्थळी पोहले. या परीसरात चोर्‍या वाढल्या असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.