धुळे– महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेनेने मालमत्ता कराच्या बिलांची होळी केली. करआकारणीचा दर कमी करून मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली. विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, सतिश महाले, विश्वनाथ खरात, राजेश पवार, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, सुनिल बैसाणे, भटू गवळी, किरण जोंधळे, पंकज भारस्कर, हेमा हेमाडे, रविंद्र काकड, जोत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, ललित माळी आदींची उपस्थिती होती.