धुळ्यात समाजवादी पार्टीतर्फे पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन

0

धुळे| अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचा उद्योग सुरु केला आहे. संपुर्ण देशात महागाईचा भस्मासुर वाढत असून या महागाईला आळा घालण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळे महागाई विरोधात आंदोलन करतांनाच समाजवादी पार्टीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. वेळीच परिस्थिती सुधारली नाही तर जनता भाजप सरकारला माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. अन्न-धान्य, दुध, तेल, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, वीजबिल सातत्याने वाढत असून या महागाईने सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. या आंदोलनात समाजवादी पार्टीचे अकिल अन्सारी, गोरख शर्मा, जमिल मन्सुरी, इमाम सिद्दीकी, अमिल पटेल, सैय्यद साबीर, डॉ.बी.यु.पवार, शकिल अन्सारी, गुलाम कुरेशी, आलमगिर शेख, गुड्ड काकर, नावीद अख्तर, सादीक अस्लम, मुन्ना शर्मा, मुबीन अन्सारी, आसीफ अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.