धुळे । जिआयुक्त, उपायुक्त तर कधी महत्वपूर्ण विभागांचे प्रमुख अनुपस्थितीत राहत असल्यामुळे या अगोदर स्थायीच्या सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. गुरुवारी तर चक्क आयुक्त, उपायुक्तांसह प्रमुख जबाबदार अधिकारी सभेला हजर राहत नसल्यामुळे शहरातील विकासाची प्रश्न मार्गी लागणार कसे? असा प्रश्न उपस्थित करत काही सदस्यांनी संताप व्यक्त केला व सभा तहकुबीची मागणी केली. तर स्थायीची सभा ही शहराच्या विकासासंबंधी निर्णय घेणारी महत्त्वाची सभा असल्याने ही सभा चालु द्यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली. यामुळे काही वेळ सभागृहात शाब्दीक चकमक होवून गोंधळ निर्माण झाल्याने अखेर सभापती कैलास चौधरी यांनी ही सभा तहकूब केल्याचे जाहिर केले.
सभापती चौधरींनी भुमिका मांडली
महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती कैलास चौधरी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्यकमलेश देवरे, मायादेवी परदेशी, संजय गुजराथी, दिपक शेलार, साबीर मोतेबर, इस्माईल पठाण, वालिबेन मंडोरे, यमुनाबाई जाधव उपस्थित होते. या सभेला सुरुवात होण्यापुर्वी आयुक्त,उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त उपस्थित नसल्याने सभापती कैलास चौधरी यांनी आपली भुमिका मांडली. आयुक्त यांची तब्येत बरी नसल्याने तर उपायुक्त रविंद्र जाधव नाशिकला मिटिंगला गेले आहेत. त्यामुळे सदस्यांनी सभा घेणेबाबत मत मांडावे असे सभापतींनी सांगितले.
अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई!
त्याबाबतीत उपायुक्त जाधव यांनी अद्याप ठोस कार्यवाही केलेली नाही आजतर आयुक्त, उपायुक्त यांच्यासह जबाबदार अधिकारी असल्याने आजच्या सभेत मंजूर होणार्या विषयासंदर्भात कार्य आदेश कोण देणार असा प्रश्न उपस्थित करत ही सभा तहकुबीची मायादेवी परदेशी यांनी मागणी केली.यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याने सभापती कैलास चौधरी यांनी जबाबदार अधिकारी नसल्याने ही सभा तहकूब केल्याचे जाहिर करत यापुढे गैरहजर राहणार्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे निर्देश दिलेत.
नागरिकांमध्ये चुकीचा संदेश
साबीर मोतेबर ,संजय गुजराथी यांनी स्थायीची सभा ही महापालिकेचा आर्थिक कणा आहे, विकासाचा गाभा आहे. या सभेत शहराच्या मुलभूत समस्या, प्रश्नांसोबत विकासाची ध्येय-धोरणे ठरविली जातात. तसेच सभापतींची औपचारीक सभेनंतर ही पहिलीच सभा असल्याने ही सभा घ्यावी. या सभेत जे विषय मंजूर होतील. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सभापतींनी व सदस्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. सभा तहकुब झाली तर नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन विकासाला खिळ बसेल. अशी बाजू संजय गुजराथी ,साबीर मोतेबर यांनी मांडली. तर मायादेवी परदेशी यांनी सभा तहकूब करावी अशी मागणी केली. या अगोदर झालेल्या सभांमध्ये जे विषय मंजूर होतात.