धुळ्यात 15 रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा

0

धुळे । शहरासह जिल्ह्यात महिला वाढते अत्याचार व छेडखानी याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक दिवसांपासून तक्रारी वाढत आहे. दरम्यान धुळे दहशतवाद विरोधी पथकाकडे त्रस्त पालकाच्या गुप्त तक्रारीवरून धुळे पोलिसांनी 15 रोडरोमिओंना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय परीसरात मुलींची छेडखानी काढणार्‍यांवर आज पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारत ताब्यात घेतले असल्याचे कळाले आहे.
महिला व मुलींना काही छेडखानी किंवा त्रास होत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा व संपर्क साधणार्‍यांचे नाव गुपीत ठेवले जाणार असल्याचे आवाहन धुळे पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.